Talathi bharti 2023 Update ! तलाठी या पदाच्या 4644 जागांसाठी भरती सुरू झाली आहे अर्ज करा?

 

जे उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ते वाट पाहत असलेल्या महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या talathi bharti 2023 update याची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांनी अर्ज करावया चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.mahabhumi.gov.com यावर सादर करायचा आहे ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये 36 जिल्ह्याच्या परीक्षा केंद्राची नावे आहेत ज्या उमेदवाराला कोणते परीक्षा केंद्र निवडायचे आहे ते त्याने ठरवायचे आहे व त्याने ते निवडायचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत talathi bharti 2023 update तलाठी गट क संवर्गातील  4644 पदाच्या सदस्य भरती करिता जमाबंदी आयुक्ता आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल

 

Talathi bharti 2023 update

खालील प्रमाणे जिल्ह्यानुसार जागा  talathi bharti 2023 

1. नागपूर  177 जागासाठी भरती.

2. अहमदनगर 250 जागांसाठी भरती.

3. मुंबई उपनगर 39 जागा साठी भरती.

4. रायगड 172 जागांसाठी भरती.

5. यवतमाळ 123 जागांसाठी भरती.

6. अकोला 41 जागांसाठी भरती.

7. गडचिरोली 158 जागांसाठी भरती.

8. हिंगोली 78 जागांसाठी भरती.

9.  जळगाव 208 जागांसाठी भरती.

10. धुळे 205 जागांसाठी भरती.

11. नंदुरबार 74 जागांसाठी भरती.

12. उस्मानाबाद 110 जागांसाठी भरती.

13. छत्रपती संभाजी नगर 161 जागा साठी भरती.

14. भंडारा 67 जागांसाठी भरती.

15. नाशिक 268 जागांसाठी भरती.

16. चंद्रपूर 167 जागांसाठी भरती.

17. गोंदिया 60 जागा साठी भरती.

18. सिंधुदुर्ग 119 जागांसाठी भरती.

19. वर्धा 78 जागांसाठी भरती.

20. वाशिम 19 जागा साठी भरती.

21. बुलढाणा 49 जागांसाठी भरती.

22. सोलापूर 197 जागांसाठी भरती.

23. ठाणे 83 जागांसाठी भरती.

24. सांगली 98 जागांसाठी भरती.

25. परभणी 105 जागांसाठी भरती.

26. सातारा 153 जागांसाठी भरती.

27. पुणे 383 जागांसाठी भरती.

28. रत्नागिरी 142 जागांसाठी भरती

29. जालना 118 जागांसाठी भरती.

30. अमरावती 56 जागांसाठी भरती.

31. कोल्हापूर 56 जागा साठी भरती.

32. नांदेड 119 जागा साठी भरती

33. लातूर 63 जागांसाठी भरती.

34. बीड 187 जागांसाठी भरती.

Talathi bharti 2023 update साठी एकूण 4644 एवढे पदे आहेत.

Talathi bharti 2023 update
Talathi bharti 2023 update

 

महाराष्ट्राच्या विभागानुसार talathi bharti 2023 update chi जागांची विभागणी 

1. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग 939 जागा

2. पुणे प्रशासकीय विभाग 887 जागा.

3. अमरावती प्रशासकीय विभाग 288 जागा.

4. नाशिक प्रशासकीय विभागात 985 जागा.

5. कोकण प्रशासकीय विभाग 838 जागा.

6. नागपूर प्रशासकीय विभाग 727 जागा.

 

Talathi Bharti 2023:- परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

1. मराठी भाषा एकूण 25 प्रश्न गुण 50 गुणासाठी

2. इंग्रजी भाषा एकूण 25 प्रश्न 50 गुणासाठी

3. सामान्य ज्ञान  एकूण 25 प्रश्न 50 गुणांसाठी.

4. बौद्धिक चाचणी एकूण 25 प्रश्न 50 गुणांसाठी

 

अशी तलाठी भरती 200 गुणांसाठी असणार आहे.

परीक्षेचा कालावधी 2:00 तास एवढा असणार आहे.

 

वयोमर्यादा (age)

Talathi bharti 2023 update अर्ज करणाऱ्या उमेदवाराची दिनांक 17.07.2023 या दिनांक च्या पूर्वीपासून गणना केली जाईल.

1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

2. मागासवर्गीय उमेदवारासाठी किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षापेक्षा जास्त नसावे त्यामध्ये उन्नत प्रगत गटाचा जे क्रिमिलियर धारण करतात त्यांना वयाची सवलत लागू राहणार नाही.

3. पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील.

4. स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य सन 1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1974 नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी किमान 45 वर्ष एवढी राहील.

5 . खेळाडू उमेदवारासाठी विविध वयोमर्यादेत पाच वर्षापर्यंत सवलत देण्यात येईल तथापि उच्चतम वयोमर्यादा 43 वर्ष एवढी राहील .

6. दिव्यांग उमेदवारासाठी तो कोणत्याही प्रवर्गाचा असो सरसकट 45 वर्ष इतके राहील व त्याच्याकडे 40% प्रमाणपत्र स्थायी वैद्यकीय मंडळाचे असणे आवश्यक आहे व त्यावर त्याचा फोटो असणे आवश्यक आहे.

7. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारासाठी कोणत्याही प्रवर्गातील असो त्या उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा  45 वर्षापर्यंत सवलत आहे.

8. माजी सैनिक उमेदवारासाठी त्या उमेदवाराचा सशस्त्र दरात झालेला सेवा इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतकी राहील तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.

 

Qualification (शैक्षणिक पात्रता)

Talathi bharti 2023 update जाहिरातीमधील नमूद पदासाठी उमेदवाराने 26. 6 .2023 रोजी पुढील शैक्षणिक पात्रता धारण केलेले असावी.

1. उमेदवार हा शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी धारण करणारा असावा.

2. उमेदवार MSCIT किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता धारण करणारा असावा. ज्या उमेदवाराकडे  MSCIT प्रमाणपत्र नाही त्या उमेदवाराने नियुक्तीचा दिनांक पासून 02 वर्षाच्या आत ते प्राप्त करून सादर करणे आवश्यक राहील.

3. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे

4. ज्या उमेदवाराकडे माध्यमिक शाळेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झाल्यानंतर उमेदवारांनी एतदर्थ मंडळाची मराठी हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

5. माजी सैनिक उमेदवारासाठी तो पदवी पात्रता असलेल्या तांत्रिक अथवा व्यवसाय कामाचा अनुभव आवश्यक नसलेल्या पदाच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी S S C उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा प्रमाणपत्र असल्यास अशा पदांना अर्ज करू शकतात.

वरील पात्रता धारण करणारा उमेदवार Talathi bharti 2023 साठी अर्ज करू शकतो.

 

Talathi Bharti 2013  अर्ज करणार उमेदवाराकडे खालील कागदपत्रे आवश्यक आहेत

1. त्या उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला म्हणजे राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

2. उमेदवाराकडून जन्म दाखला असणे आवश्यक आहे

3. ज्या उमेदवाराकडे जन्म दाखला नाही त्या उमेदवाराकडे शाळा सोडण्याचा दाखला असणे आवश्यक आहे.

4. जो उमेदवार जातीच्या प्रवर्गामधून अर्ज करणार आहे त्या उमेदवाराकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

5. उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र हे निवडीअंती सादर करणे आवश्यक राहील.

6. ज्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही त्या उमेदवाराने नियुक्तीनंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

7.  ज्या उमेदवाराची talathi bharti update पदासाठी निवड झाली आहे त्या उमेदवारांचे मूळ प्रमाणपत्र तपासण्यात येतील ते उपलब्ध करून देणे उमेदवाराचे बंधनकारक राहील व त्यामध्ये चुकीची माहिती आढळल्यास उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

 

काही महत्त्वाचे कागदपत्रे

1. अर्जातील नावाचा पुरावा.

2. उमेदवाराचा वयाचा पुरावा

3. उमेदवाराचा शैक्षणिक पात्रता धारण केलेला पुरावा.

4. उमेदवार सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असेल त्याचे प्रमाणपत्र

5. उमेदवार नॉन क्रिमिनल धारण करणारा असेल तर असावे.

6. उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र.

7. उमेदवार माजी सैनिक असल्यास त्याचे प्रमाणपत्र.

8. उमेदवार खेळाडू असेल तर खेळाडूचे प्रमाणपत्र.

9. उमेदवार हा अनाथ आरक्षणासाठी असेल तर त्याचे प्रमाणपत्र.

10. उमेदवार प्रकल्पग्रस्त असेल तर त्याचे प्रमाणपत्र.

11. उमेदवार भूकंपग्रस्त असेल तर त्याचे प्रमाणपत्र.

12. मराठी भाषेचे ज्ञान असल्यास त्याचा पुरावा.

13. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र नावात जर बदल झाला असेल तर त्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणास पात्र असल्याचा पुरावा इत्यादी प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.

 

Monthly salary (वेतन)   talathi bharti 2023 update 

ज्या उमेदवाराची तलाठी पदासाठी निवड होईल त्या उमेदवाराला लेवल आठ प्रमाणे 5200 ते.20200 + ग्रेड पे 2400 एवढे वेतन मिळेल.

अर्ज करण्यासाठी इतर महत्त्वाच्या सूचना talathi bharti 2023 update 

 

1. अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल.

2. उमेदवाराला फक्त एका जिल्ह्यामध्येच अर्ज सादर करता येईल दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज सादर केला तर पात्र धरण्यात येईल.

3. उमेदवाराला अर्ज करण्याबाबत सविस्तर माहितीसाठी www.mahabhimi.gov.in. या वर जाऊन पाहावे.

4. उमेदवारांनी ऑनलाइन चलन करायचे आहे चलन न केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही व नमूद तारखेच्या आत मध्ये ऑनलाईन पेमेंट करण्याची बंद होईल.

Fee ( परीक्षा शुल्क )

1. जो उमेदवार खुल्या प्रवर्गात मोडत आहे त्या उमेदवारासाठी 1000 रुपये एवढी असेल.

2. जो उमेदवार राखीव प्रवर्ग मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहे त्या उमेदवारासाठी 900 रुपये एवढी असेल.

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख :-  दिनांक 26. 06. 2023 रोजी पासून व दिनांक 17. 07. 2023 रोजी 11.59 pm पर्यंत.

ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख. :- दिनांक 17. 7. 2023 रोजी 11 : 55 PM पर्यंत.

टीप :- परीक्षा दिनांक अजून उपलब्ध झालेले नाही उपलब्ध झाल्यानंतर कळवण्यात येईल.

Talathi bharti 2023

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा